Bhandup मध्ये हेडफोनमुळे 17 वर्षीय तरुणानं गमावला जीव, नेमकं काय घडलं भांडूपमध्ये? जाणून घ्या

भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये शॉक लागून 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय...दीपक हा एल बी एस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता... परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन वायर खुली होती. त्या मधून झालेल्या विजेचा प्रवाहामुळे शॉक लागून दिपकचा मृत्यू झाला. प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याने कानात हेडफोन घातले होते. येथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले, परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो या वायर च्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. महत्त्वाचा म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं.त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले. भांडूपमधील ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी

संबंधित व्हिडीओ