राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज नांदेड जिल्ह्यात शेतीतील नुकसानीची पाहणी केलीय.. मात्र कृषीमंत्र्यांनी शेतात न जाता रस्त्यावर उभं राहुन ही पाहणी केलीय...जिल्ह्यात ढगफुटीमुळे सुमारे साडेसात लाख एकर शेतीचं नुकसान झालंय.. मात्र कृषिमंत्र्यांनी केवळ हदगाव तालुक्यातील एका गावातील पाहणी अवघ्या वीस मिनीटात उरकत आपला दौरा आटोपलाय.. राज्याचे कृषिमंत्री शेतीची पाहणी शेतात न जाता करत असतील तर शेती आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल याबाबत शंका उपस्थित करण्यात येतेय..