एकही गाव वगळू नका, सरसकट पंचनामे करा; Tanaji Sawant यांचा तहसीलदारांना फोन, दिल्या सूचना | NDTV

माजी मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या भूम परंडा वाशी मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना दिल्यात. मतदार संघातील शेती नुकसानीच्या पंचनामाच्या सावंतांनी थेट पुण्यातून सूचना दिल्यात. सरसकट पंचनामे करा एकही गट, गन, गाव वगळू नका . मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू तुम्ही पंचनामे करा. असं तानाजी सावंत तहसीलदार यांना फोनवरून सांगत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सावंत समर्थकांकडून वायरल केला जात आहे. परांडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सावंतांच्या मतदारसंघात जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी जाऊन पाहणी केली मात्र निवडणुकीनंतर अद्यापही तानाजी सावंत मतदारसंघात फिरकले नाहीत. एवढे नुकसान होऊनही तानाजी सावंत मतदारसंघात न येता केवळ एक व्हिडिओ काढून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ