प्रेमविवाहाच्या रागातून बापाने मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातल्या आंबेडकर नगर परिसरात घडलीय.या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यावरून मुलगी आणि जावई आले असल्याची माहिती मिळताच, आरोपी किरण मांगलेनं विवाह समारंभात येऊन मुलगी आणि जावयावर गोळीबार केला.यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय. तर जावई अविनाश वाघ जखमी आहे.गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिकांनी किरण मांगले यास चांगला चोप दिला असून जमावाने चोप दिल्याने किरण मांगले ही गंभीर जखमी झाला आहे. किरण मांगले हा CRPFमधील माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.