ED कडून सायबर गुन्ह्यांचा तपास, 30 हजार कोटींचे संशयास्पद व्यवहार; मुंबईतून दोघांना अटक

देशभरात पसरलेल्या सायबर फसवणूक आणि डिजिटल अटक प्रकरणाचा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने पर्दाफाश केला आहे. या देशव्यापी घोटाळ्यात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मोठी कारवाई करत ईडीने मुंबईतून फहीम मोईन हुसेन सय्यद आणि नईम मुईन सय्यद या दोन संशयितांना अटक केली आहे.गोव्यातील एका महिलेला डिजिटल अटक करून सायबर गुन्हेगारांनी तिच्याकडून तब्बल 2.60 कोटी रुपये उकळले होते. ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा करण्यास भाग पाडले गेले होते. या प्रकरणी या दोघांना अटक करण्यात आलीय.

संबंधित व्हिडीओ