Dombivli तील नेहरू मैदानावर अतिक्रमण? MNS नेते हर्षद पाटलांचा मैदानासाठी लढा; KDMC आयुक्तांना पत्र

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेहरू मैदानात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप डोंबिवली मनसे अध्यक्ष हर्षद पाटील यांनी केला आहे. मैदानावर शेड उभारण्यासोबतच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेले शौचालय तोडून त्या ठिकाणी मंडळाचे कार्यालय उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी हर्षद पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन संबंधित अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या बांधकामाला पाठिंबा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ