शनिवारी मुंबईतील भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळल्यानंतर आता मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय...
मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने याबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्डे, जीर्ण पूल आणि वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांबाबत पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. १४ ऑगस्ट रोजी पालिका मुख्यालयात जाऊनही दोन तास प्रतीक्षा करूनही आयुक्तांची भेट मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची स्थिती सुधारण्याची मागणी समितीने पुन्हा एकदा केली आहे.