जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या डिझेल तुटवड्याचा मोठा फटका वाहतूक व्यवस्थेला बसलाय. डिझेल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात हजाराहून अधिक मालवाहतूक करणारे ट्रक विविध ठिकाणी उभे असून अप्रत्यक्ष चक्काजामची परिस्थिती निर्माण झाली आहे.