गेल्या चार दिवसांपासून देशातील एका महामार्गाचा श्वास कोंडलाय. चार दिवस दिल्ली कोलकाता महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय.शनिवारपासून रोहतास जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग १९ वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्यात. २४ तासांत केवळ पाच किमी अंतर हा वेग आहे या राष्ट्रिय महामार्गावर.... हतूक कोंडीमुळे वाहनांच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झालाच आहे शिवाय वाहनचालकांना तहानभूक लागली आहे. त्यांना चार दिवसांपासून कोणतीही मदत मिळालेली नाही... मात्र एका राष्ट्रीय महामार्गावर अशी वाहतूक कोंडी का झालीय. त्यावर काहीच का उपाय केला जात नाहीए, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय केलं जातंय का... पाहूया एक रिपोर्ट.