डोंबिवलीच्या पलावा सोसायटीत सुरक्षारक्षकाकडून मुलांना मारहाण करण्यात आली आहे. मुलांचे हात बांधून सुरक्षारक्षकाकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय.पलावा कासा बेला गोल्ड या हाय प्रोफाईल सोसायटीत धक्कादायक प्रकार घडला आहे. मुले खेळत असताना बॉल इमारतीत गेला या रागातून मारहाण करण्यात आली आहे. पालकांनी जाब विचारला असता सुरक्षा रक्षकानं मुजोरी केल्याचंही समजतंय. मारहाण करणाऱ्या सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं.