जरीपटका ठाण्या अंतर्गत एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाला आहे.बाबू छत्री नावाचा कुख्यात गुन्हेगार काल उशिरा रात्री वायर ने बांधलेला आणि तीक्षण शस्त्रांनी जबर जखमी केलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात सांगण्यात आले. या संदर्भात संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याने अमिताभ बच्चन अभिनित झुंड चित्रपटात छोटी भूमिका केली होती. मात्र, तो पोलिस record वरील गुन्हेगार देखील होता