Putin 73rd Birthday | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 73वा वाढदिवस,जाणून घेऊया या नेत्याबाबत

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ७३ वर्षांचे झाले. २०१२पासून ते रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर आहेत. रशियात या घडीला त्यांना आव्हान देऊ शकेल असं कोणी दिसत नाही. तशी त्यांनी तजवीजही केली आहे, मात्र केवळ रशियाच नव्हे तर जगातही एक शक्तीशाली नेता म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. टाईम्स मॅग्झीननंही त्यांना चार वेळा जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून घोषित केलेलं आहे. ९०च्या दशकात सोव्हिएतचं विघटन झाल्यानंतर रशिया आता संपला अशी परीस्थिती निर्माण करण्यात आली मात्र त्याच काळात पुतिन यांची राजकीय कारकिर्दी घडत होती. पुतिन यांची महत्त्वाकांक्षा वाढत होती. पुतिन म्हणजे रशिया आणि रशिया म्हणजे पुतिन असं चित्र आता तयार झालंय. पाश्चात्या जगाला थेट भिडणाऱ्या या नेत्याबाबत जाणून घेऊया या रिपोर्ट मधून....

संबंधित व्हिडीओ