रसायनशास्त्रातील २०२५ साठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.रॉयल अकादमी ऑफ सायन्सेस ना याची घोषणा केली. सिसुमु कितगाव, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एस याघी यांना हे पारितोषिक देण्यात आलंय. धातू सेंद्रिय चौकटीतील विकासा साठी पुरस्कार देण्यात आला आहे.बुधवारी पुरस्कार जिंकणारे तिघेही शास्त्रज्ञ अनुक्रमे जपानमधील क्योटो,ऑस्ट्रेलियातील मेलबर्न आणि अमेरिकेतील बर्कले या विद्यापीठांमधून आले आहेत.या तिघांनी "मोठ्या जागेसह आण्विक बांधकामे तयार केली आहेत ज्यातून वायू आणि इतर रसायने वाहू शकतात." अशा बांधकामांचा वापर वाळवंटातील हवेतून पाणी साठवण्यासाठी, कार्बन डायऑक्साइड शोषण्यासाठी, विषारी वायू साठवण्यासाठी किंवा वातावरणातील औषधांचे अवशेष तोडण्यासाठी केला जाऊ शकतो., असं नोबेल पारितोषिकाच्या निवेदनात सांगण्यात आलंय.