2025मध्ये देशभरातच पावसानं जोरदार धुमशान घातलं. अनेक वेळा ढगफुटी, भूस्खलनाच्या घटनांनी सारा देश हादरला.. जगातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळालं. मात्र आता वातावरण बदलतंय. हंगामातली पहिली बर्फवृष्टी झालीय. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी झालीय. उत्तराखंडमधल्या केदारनाथ, बद्रीनाथ इथं या थंडीनं चाहुल दिलीय. तिथं तर तापमान आता ५ अंशांपर्यंत खाली आलंय. याच थंडीचा प्रवास पुढे खाली देशात होतो. त्यामुळे यंदाचा हिवाळा कसा असेल याची झलक पाहायला मिळतेय. पावसाळ्यानं जसा ऊत आणला तसा हिवाळा देशाची डोकेदुखी ठरणार आहे का. अलिकडेच हिमालयात म्हणजे माऊंट एव्हरेस्टवर हिमवादळ येऊन गेलंय. त्यामुळे यंदा हिवाळ्यात आपल्या देशावर किती परिणाम होईल पाहूया एक रिपोर्ट.... Uttarakhandच्या केदारनाथ, बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी;ऑक्टोबरमध्येच डिसेंबरसारखी थंडी? यंदाचा हिवाळा कडक जाणार?