जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय.धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय... त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.. दरम्यान, प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.