कांदिवलीतील मराठी रिक्षा चालकाला झालेल्या मारहाण प्रकरणात मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांविरोधात सहा तासांच्या विलंबानंतर एफआयआर नोंद करण्यात आला. सुरुवातीला कांदिवली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मराठी रिक्षा चालकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला. जाणीवपूर्वक दुखापत करणे, शांतता भंग करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.