वातानुकुलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या केडीएमटीकडून प्रवाशांच्या पदरी निराशाच पडलीय. डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ मुळे अचानक गायब झाल्या आहेत.. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागतोय. एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटी मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.