माढा तहसीलदारांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून कुर्डू गावातील गट नंबर ५७५-१ मधील १२० ब्रास मुरूम उत्खनन अवैध असल्याचे स्पष्ट केले आहे. शिराळ, कुर्डू आणि अंबड येथील रस्त्यांसाठी हा मुरूम वापरण्यात आला, मात्र उत्खननाच्या आदेशाला मुदतवाढ दिली नव्हती, असे अहवालात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत अहवाल मागवला होता, त्यामुळे या अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.