मुंबईतील प्रभादेवी परिसरात काल रात्री ठाकरे आणि शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकासाच्या वादावरून हा संघर्ष सुरू झाला. दोन्ही गटांमधील तणाव आणि शहरात सुरू असलेला संघर्ष या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.