काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यात रायबरेलीतील ‘दिशा’ बैठकीत जोरदार वाद झाला. राहुल गांधी यांनी दिशाचे अध्यक्ष म्हणून अधिकार सांगितल्यावर हा वाद सुरू झाला. यावर दिनेश प्रताप सिंह यांनी संसदेत अध्यक्षांचे म्हणणे न ऐकल्याबद्दल गांधींना टोमणा मारला. या शाब्दिक वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.