Latur| NEET पेपरफुटी प्रकरणी आणखी एका डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू | NDTV मराठी

लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता आणखी वेगाने सुरू असून आणखी एका डॉक्टरचे नाव सीबीआयच्या रडारवर आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एका बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. पेपर खरेदीच्या संशयातून काही डॉक्टरांची नावे तपासात समोर आली असून सीबीआयकडून तपासाची व्याप्ती वाढवली जात आहे. सकाळी एका डॉक्टरची चौकशी पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या डॉक्टरांकडे सीबीआयच्या पथकाने मोर्चा वळवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून असून विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेसशी संबंधित व्यक्ती आणि संशयित डॉक्टरांची सातत्याने चौकशी केली जात आहे. या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ