महाराष्ट्रात व्याघ्रवाढीचा सकारात्मक परिणाम दिसत असला तरी व्याघ्रमृत्यूंची संख्याही मोठी असल्याचे समोर आले आहे. देशात मागील चार महिन्यांत ६२ व्याघ्रमृत्यू झालेयत.. त्यातील २० मृत्यू महाराष्ट्रात झालेले आहेत.परिणामी व्याघ्र मृत्यूत देशात महाराष्ट्र टॉप असून मध्य प्रदेश १७ वाघांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या क्रमांकावर आहे.