जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मॉन्सूनने पुन्हा एकदा दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे.येत्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासाह वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे.तसेच या काळात राज्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यांचा वेग प्रति तास 45 ते 55 किमी असण्याचा अंदाज आहे.हवामान खात्याने मराठवाड्यालाही पावसाचा इशारा दिला आहे.