भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला झाला. क्वेट्टा येथील मार्गट चेकपोस्टजवळ एका वाहनाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा मृत्यू झालाय.तर, तीन जण जखमी झाले आहेत. हा बॉम्ब स्फोट कोणी केला? हे समजू शकलेले नाही.परंतु, बलुच अतिरेक्यांनी हा बॉम्ब स्फोट केल्याचा दाट संशय आहे. अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.