नाशिकच्या मनमाडमध्ये बस स्थानक इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे बसस्थानक आवारातील रस्त्याची दुरावस्था झाली असून, रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण परिसर चिखलमय झालाय. तर प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागतेय. दरम्यान बस स्थानक परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी...