मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे... अजूनही बीड आणि धाराशिव मध्ये लोकांना वाचवण्याचं काम सुरू आहे. धाराशिव मध्ये 150 लोक अजूनही अडकले तर बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावात 28 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.. बीड धाराशिव आणि परभणी मध्ये आर्मीचे पथक पाठवण्यात आले आहे. एन डी आर एफ चे जवानही या तीन जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत. पावसानं आठ लोकांचा जीव घेतलाय तर 150 पेक्षा अधिक जनावर दगावली आहेत.. मराठवाड्यात काय स्थिती आहे याविषयी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली