राज्यातील पूरस्थितीचा फटका थेट नवी मुंबई APMC ला बसला आहे. पावसामुळे आवक घटल्याने बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्यांचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले असून फुलकोबीचा भाव 100 रुपयांवर पोहोचला आहे. टोमॅटो, कारली, भेंडीचे दरही वाढले आहेत.