अष्टमीनिमित्त ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका देवीच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून २०० हून अधिक भाविकांनी देवीचा अभिषेक केला आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंबासह देवीची पूजा करणार आहेत. मंदिरात दर्शनासाठी उत्साहाचे वातावरण आहे.