Satara | फलटण पंचायत समिती | BJP चा मित्रपक्षांना धक्का, सभापती-उपसभापती निवडीत मोठा ट्विस्ट

सातारा जिल्ह्यातील फलटण पंचायत समितीच्या राजकारणात मोठी राजकीय कलाटणी पाहायला मिळाली आहे. सभापती आणि उपसभापती निवडीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य भाजपमध्ये प्रवेश करताच सत्ता समीकरणे अचानक बदलली आणि भाजपने सभापती पद आपल्या ताब्यात घेतले. भाजपच्या शिवांजली भोसले यांची फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापती पदावर शिवसेना शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत समाधान मानले.या संपूर्ण राजकीय घडामोडीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची रणनीती निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

संबंधित व्हिडीओ