उंदराने रुग्णाचा हात कुरतडला, MNSकार्यकर्ते डॉक्टर्सच्या केबिनमध्ये शिरले;भाईंदरच्या रुग्णालयात राडा

भाईंदरमधून धक्कादायक बातमी समोर येतेय. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा हात उंदराने कुरतडला. 89 वर्षांच्या सुहासिनी माठेकर या 12 मार्चपासून रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती आहेत. मात्र आयसीयूमध्ये उंदरांनी उच्छाद मांडलाय. एका उंदराने या रुग्णाचा हात कुरतडल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या. सकाळी जेव्हा रुग्णाचे नातेवाईक आले तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आलाय.

संबंधित व्हिडीओ