नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी मुंबई मेट्रो 3 चा आचार्य अत्रे मार्ग ते कफ परेडदरम्यान अखेरचा टप्प्यातल्या मेट्रो सेवेलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे आरे कॉलनी, बीकेसी, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालय, विधानभवन मेट्रो मार्गिकेने जोडले जाणार आहेत. बहुप्रतिक्षित मुंबई मेट्रो-3ची पहिली पूर्णपणे भूमिगत 'अॅक्वा लाईन'आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास सज्ज झाली आहे. या महत्त्वाच्या टप्प्यामुळे आता कफ परेड ते आरेपर्यंत अखंड कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.या टप्प्यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, CSMT, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्टेशन प्रवाशांसाठी खुली होतील... या आधुनिक स्थानकांमुळे मुंबईचा उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होईल.