मुंबई महापालिकेत महायुतीतील मानापमान नाट्य सुरुच आहे.. प्रशासकीय कार्यक्रमात उपमहापौरांना दुय्यम स्थान मिळालं.. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपुजन झालेल्या सायन रुग्णालय इमारतीच्या कार्यक्रमावरुनही वाद निर्माण झालाय.. मानापमान नाट्य, नाराजीवर तोडगा काढण्यासाठी महापौरांच्या दालनात बैठक सुरुय.. मुंबई महापालिकेच्या असलेल्या सायन रुग्णालयातील नव्या इमारतीचे भूमीपुजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं.. यावेळी कार्यक्रमस्थळी महापौर वगळता पालिकेतील इतर समिती अध्यक्ष, नगरसेवकांना प्रवेश नाकारण्यात आला होता.. त्याचबरोबर, महापालिकेच्या रुग्णालयासंबंधी कार्यक्रम असूनही महापालिकेच्या नेत्यांनाच सुरक्षारक्षकांकडून प्रवेश नाकारण्यात आला.या सर्व प्रकारावरून आता नाराजीनाट्य रंगलं.