Nashik मध्ये आढळला पांढरा बिबट्या, पथकाने TTC मध्ये बिबट्याची केली वैद्यकीय तपासणी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी वनपरिक्षेत्रातील ऊसशेतीत बिबट्याची नवजात पिल्लं आढळून आलीत. दिंडोरी वनपथकाने धाव घेत या पिल्लांना रेस्क्यू केलं होतं. मात्र त्यापैकी एका बछड्याची त्वचा पांढरी असल्याचे आढळून आल्याने नाशिक डिव्हिजनच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने दहा दिवसांच्या तीनही बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट घडवून आणली. पांढऱ्या त्वचेचा बछड़ा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना आहे. पथकाने टीटीसीमध्ये आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता सहा दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला यानंतर पथक पुन्हा बछड्यांना घेऊन चाचडगावातील ऊसशेतीत पोहोचले. आणि आई आणि बछड्यांची पुन्हा भेट घालून दिलीय.

संबंधित व्हिडीओ