आखाती युद्धाचा परिणाम सांगली जिल्ह्यामध्ये बसत आहे. सांगली मिरज शहरांमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा भासत असल्यामुळे एलपीजी गॅस पंप बंद पडले आहेत. त्यामुळे एलपीजी गॅसवर चालणाऱ्या तब्बल 4 हजार हुन अधिक रिक्षा ह्या बंद अवस्थेत पडल्या आहेत. रिक्षा चालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रिक्षा संघटनेकडून जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अन्यथा दोन तारखेला रिक्षा संघटनेकडून तीर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.