आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांच्या भेटीवरुन संजय शिरसाटांनी मात्र ठाकरे गटावर निशाणा साधलाय... भाजपवर बेछूट आरोप करणारे आता त्यांच्याकडेच जाण्यासाठी कारण शोधतायत असा टोला संजय शिरसाटांनी लगावलाय... तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र आदित्य ठाकरेंची पाठराखण केलीय.. राजकीय विषय आणि कौटुंबिक भेटी वेगवेगळ्या. कुणाच्या लेकीच्या वाढदिवसाला गेल्यास काय बिघडलं? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारलाय..