पुण्यातील औंध आणि बाणेर परिसरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या पुणेकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळालाय.हा बदल पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.हा अवकाळी पाऊस वातावरणातील बदलांमुळे, पुढील काही दिवस हलक्या सरी पडू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलंय.मावळ तालुक्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आज झालेल्या या रिमझिम पावसामुळे उकाड्यापासून सुटका झालीय.