महामुंबई क्षेत्रात प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण आता मेट्रो, बस, लोकल ट्रेन किंवा मोनोचं वेगवेगळं तिकीट काढण्याचा त्रास संपणार आहे. आता या सर्व वाहतूक सेवांचं तिकीट एकाच ठिकाणी काढता येणार आहे. मुंबई वन असं या ऑनलाईन तिकीट अॅपचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या अॅपचं उद्घाटन होणार आहे.. महामुंबई क्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर तसंच नवी मुंबई महापालिकेची बससेवा आहे. तसंच मुंबईच्या लोकलसेवेसोबत मेट्रो आणि मोनोरेलचीही सेवा उपलब्ध आहे... सध्या या सर्व सेवांसाठी वेगवेगळी तिकीटं काढावी लागतात. मात्र मुंबई वन या अॅपवर ऑनलाईन पद्धतीने एकच तिकीट काढता येणार आहे..