दुष्काळाची दाहकता वाढत आहे. अशातच शेतकऱ्याला आर्थिक फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यात ऊस दर संघर्ष समिती आक्रमक झालेली दिसून येत आहे. ऊसाला अधिकचा भाव मिळावा. उसाच्या दराच्या पहिल्या हप्ता जाहीर करावा. याबाबत ऊस दर संघर्ष समिती आंदोलन करत आहे. . या बैठकीमध्ये येत्या काळात कारखान्याचे चेअरमन आणि आमदार , खासदार यांना उसाचा पहिला हप्ता आणि दर जाहीर होईपर्यंत गावात फिरकू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कारखान्याचे चेअरमन आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ऊसदरासाठी शेतकरी संघटनांच्या ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
Solapur | Farmers in Solapur take an aggressive stance over sugarcane prices; decide to bar entry into their villages after no price is announced for the crop.