जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान तणाव निर्माण झाला.. पथसंचलनाच्या मार्गाला एका गटाने विरोध करत रस्त्यावर ठिय्या दिल्याने परिस्थिती चिघळली. या वेळी पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दगडफेकीची घटना घडली.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. सध्या किनगावमध्ये तणावपूर्ण शांतता असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.