Nandurbar तापला, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हायअलर्टवर | NDTV मराठी

नंदुरबार जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वरती गेलंय.वाढत्या तापमानाची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे.जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली.नागरिकांना उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात कक्षात उपचार घ्यावेत असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शहादा ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज झालाय.. नागरिकांनी वाढत्या तापमानात दुपारच्या वेळेस बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येतंय.

संबंधित व्हिडीओ