सततच्या पावसाने नाशिकच्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरण अखेर ओव्हर फ्लो झालं, सांडव्यावरून पाणी वाहू लागलेले आहे...सुमारे 110 दशलक्ष घनफूट क्षमता असलेले हे धरण कोरडेठाक असल्याने नागरिकांना महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात होता.आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने हे पाणी पुढचे सहा महिने पुरणार असल्याने मनमाड शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त तरी मिटल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी वाघदर्डी धरणावरून आढावा घेतलाय पाहुयात...