बीड जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परळी तालुक्यातील पोहनेर गावाचा संपर्क तुटला आहे. या कठीण परिस्थितीत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे स्वतः थर्माकोलच्या होडीतून प्रवास करून गावात पोहोचले. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. संपूर्ण पूरस्थिती, मदतकार्य आणि उपलब्ध यंत्रणांचा आढावा घेत प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.