महायुती सरकारमधील कथित नाराजीनाट्यावर एकनाथ शिंदे आणि अमित शाहा यांची पुण्यातील एका हॉटेलमध्ये पहाटे चार वाजता बैठक झाल्याचा दावा संजय राऊत यांनी रोखठोक या सामना मधील सदरातून केलाय. या बैठकीत दोघांमध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल राऊतांनी खुलासा केलाय.