NDTV Marathi Special| मुंडेंना परत मंत्रीपद? राज्यातल्या चार राजकीय मोठ्या बातम्या, पण हे घडेल का?

सर्वात पहिली बातमी.धनंजय मुंडेंसंदर्भात मोठी माहिती समोर येतेय.. मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेतच अजित पवारांनी दिले का अशी चर्चा आता सुरु झालीय.दुसरीकडे महायुती सरकारमधील तब्बल आठ मंत्र्यांना नारळ दिला जाणार, असा सनसनाटी दावा ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आलाय. तिसरी महत्वाची बातमी म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची.. कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. आणि चौथी महत्वाची बातमी आहे महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.काँग्रेसचा मोठा नेता लवकरच हातात कमळ घेण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ