यानंतर या गुंड निलेश घायवळने चिंता वाढवलीय ती एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांची आणि आमदारांची, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निलेश घायवळ याच्या भावाला म्हणजेच सचिन घायवळचा शस्त्र परवान्याचा अर्ज मंजूर केला.सचिन घायवळ ढिगभर गुन्हे दाखल आहेत, पण तरीही योगेश कदमांनी याच्या नावाची शिफारस कशी केली असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेयत.या प्रकरणानंतर आता योगेश कदमांविरोधात विरोधक आक्रमक झालेयत पण योगेश कदमांच्या मदतीला त्यांचे वडिल रामदास कदम धावून आलेयत.रामदास कदमांनी केलेल्या दाव्याने महायुतीसह राज्यात एक नवी खळबळ माजलीय, योगेश कदम यांची कशी चिंता वाढवलीय पाहुयात...