Nishikant Dubey यांनी उद्धव ठाकरेंच्या नेत्याचा भ्रष्टाचार काढला बाहेर, पोस्टमध्ये काय काय लिहिलं?

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्दायावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विरोधानंतर या वादात उडी घेतली आहे. त्यांनी थेट मराठी विरूद्ध इतर भाषिक अशा वादाला फोडणी देत महाराष्ट्राविषयी गरळ ओकली होती...पण त्यानंतरही दुबे थांबलेले नाहीत... खासदार दुबेंनी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे... दुबेंनी याबाबत सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे... शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहानी असे म्हणत त्यांनी संबंधित नेत्याचे किती, कुठे फ्लॅट आहेत, याची माहिती सोशल मीडियात पोस्ट केली आहे.

संबंधित व्हिडीओ