नितेश राणेंच्या याच वक्तव्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येतायत एकीकडे मोदी देश एकवटण्याचा प्रयत्न करतायत पण दुसरीकडे नितेश राणे देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसच्या प्यारे खान यांनी केली.तर नितेश राणेंची अशी वक्तव्यच हल्ल्यांना कारणीभूत ठरल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय.