Mohan Bhagwat यांच्या विधानावर विरोधकांचे टोले, संजय राऊत-नाना पटोलेंची टीका, काय म्हणाले पाहा?

वयाची पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो.. असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय.. पंच्याहत्तरीनंतर माणसाने बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे, असा संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिला होता याची आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढली..'मोरोपंत पिंगळे, आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मोहन भागवतांनी ही आठवण सांगितली. मोहन भागवतांनी केलेल्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवृत्तीवरुन संजय राऊत यांनी टीका केली.सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होतात, त्यांची दाढी पिकलीय, डोक्यावरचे केस उडाले आहेत असं राऊत म्हणालेत. मोदींना आता आरएसएसकडून निवृत्त व्हावं लागेल असा टोला राऊतांनी लगावलाय. हा विषय त्यांच्या घराचा निर्णय आहे... त्यांनी अद्याप राष्ट्रीय अध्यक्षही निवडला नाही.. असं पटोले म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ