एसटी महामंडळाच्या बैठकीत आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ खोत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालेत. एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर चर्चा सुरू असताना, संतापलेले दोन्ही नेते थेट एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या (MD) अंगावर धावून गेले. या गंभीर प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.एमडींवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन सदाभाऊ खोत यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय.