Pahalgam Terror Attack| भारतीय सैन्यानं पिंजून काढला जम्मू काश्मीर, दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त

काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांनं अख्खा काश्मीर पिंजून काढला जात आहे.आणि एका-एका दहशतवाद्याला शोधून मारलंय. जे अतिरेकी सापडले नाहीत पण दहशतवादाशी संबंध आहे.अशा अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त केली.ज्या अतिरेक्यांवर संशय आहे त्यांच्या घरांची झाडाझडती घेतली जात आहे.पहलगामनंतर काश्मीर खोऱ्यात लपलेला प्रत्येक अतिरेकी आता सैन्याच्या बंदुकीच्या निशाण्यावर आहे. पहलगाम हल्ल्यातील आसिफ आणि आदिल ठोकर यांची घरं उद्ध्वस्त केल्यानंतर काल चार दहशतवाद्यांची घरं सुरक्षा रक्षकांनी उद्ध्वस्त केली.शोपियानमधील छोटीपोरातील लष्कर ए तोयबाचा सक्रीय दहशतवादी शाहिद अहमद कुट्टे याच्या घरावर कारवाई केली.शाहिद अहमद कुट्टेचं घर भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केले आहे. शाहिद गेल्या ३-४ वर्षांपासून लष्कर ए तोएबामध्ये सक्रिय आहे. आणि तो अनेक देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहे. दुसरीकडे कुलगाम जिल्ह्यातील मटालहामा भागात दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या जाहिद अहमद याचंही घर उडवण्यात आलं. तिसरीकडे पुलवामातील मुर्रान भागात अहसान उल हकचं घर जमीनदोस्त करण्यात आलं. अहसान 2008 सालापासून पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेऊन परतला होता.अहसानचा पहलगाममधील हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय आहे.

संबंधित व्हिडीओ